Wife Beats Husband Saam TV
क्राईम

Wife Beats Husband : मेहुणीसोबत डीजेवर नाचणं भावोजीला पडलं महागात; बायकोने मंडपातच चप्पलने बेदम चोपलं

Agra Crime News : माझ्यासोबत माझ्या पत्नीची बहिण देखील डान्स करत होती. हे माझ्या पत्नीने पाहिलं आणि तिने सरळ पायातील चप्पल हातात घेतली. मागचापुढचा काहीच विचार न करता तिने तेथेच मला चप्पलने मारलं.

Ruchika Jadhav

Crime News :

पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास नसेल तर ते नातं फार काळ टिकत नाही, असं म्हणतात. पती-पत्नीमध्ये कितीही वाद झाले तरी प्रमे असल्यास नातं टिकून राहतं. या नात्यात होणाऱ्या भांडणांच्या आणि घटस्फोटाच्या आजवर अनेक घटना समोर आल्यात.अशात उत्तरप्रदेशच्या आग्रा येथून एक हस्स्यास्पद आणि खळबळजनक घटना समोर आली आहे.

उत्तरप्रदेशच्या आग्रामधील एका पत्नीने आपल्या पतीची लग्न मंडपात चप्पलने धुलाई केली आहे. या घटनेमुळे पती नाराज असून त्याने आणि त्याच्या पत्नीने एकत्र न राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. घटनेनंतर पती आणि पत्नी दोघांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावर हे प्रकरण पुढे कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आलं आहे.

पतीने समुपदेशन केंद्रात पोलिसांना संगितले की, मी आणि माझी पत्नी नातेवाईकांच्या एका लग्नाला गेलो होते. तेथे डीजेवर सर्वजण डान्स करत होते. यावेळी मी देखील तिथे होतो. माझ्यासोबत माझ्या पत्नीची बहिण देखील डान्स करत होती. हे माझ्या पत्नीने पाहिलं आणि तिने सरळ पायातील चप्पल हातात घेतली. मागचापुढचा काहीच विचार न करता तिने तेथेच मला चप्पलने मारलं.

झालेल्या घटनेमध्ये सर्व पाहुण्यांसमोर माझा मोठा अपमान झाला. त्यामुळे मला तिच्यासोबत पुढील आयुष्य जगायचे नाही, असं पतीने म्हटलं आहे. तर पत्नीने यावर म्हटलं की, माझा पती गेल्या काही दिवसांपासून सतत माझ्या बहिणीला कॉल करतो. त्यात लग्नामध्ये तो तिच्यासोबत नाचू लागला. हे पाहून मला राग अनावर झाला. त्यामुळे मी माझी चप्पल त्याच्याकडे फेकली.

दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने आणि मन दुखावली गेल्याने दोघांनी देखील एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कौटुंबिक समुपदेशन केंद्रात त्यांची केस सुरू असून दोघांचेही समुपदेशन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT