Uttar Pradesh Crime News SAAM TV
क्राईम

Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी हापापलेल्या नवऱ्याने बायकोच्या नाकाचा घेतला चावा; उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना

Uttar Pradesh :उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.बरेलीमध्ये सासरच्या लोकांनी हुंडा कमी दिल्याने महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Crime News:

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.बरेलीमध्ये सासरच्या लोकांनी हुंडा कमी दिल्याने महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या पतीने हुंड्यांची मागणी करत तिच्या नाकाचा चावा घेतला आहे, पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

अजमी असे पीडित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सीबी गंज पोलिस ठाण्यात नवऱ्याच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमीने मंगळवारी तिचा पती नाझिम, सासरा साबीर आणि कुटुंबियातील इतर सदस्यांविरोधात तक्रार केली आहे. हुंड्यासाठी छळ आणि मारहाण होत असल्याचे, तिने सांगितले.

अजमीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले होते. आम्हाला पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर लगेचच सासरच्यांनी कमी हुंडा दिल्याने माझा छळ सुरू केला. माझ्या नवऱ्याने मला अनेकदा मारहाण केली. घराबाहेरदेखील काढले होते. भांडण मिटवण्यासाठी त्यांच्या पंचायतीकडून देखील प्रयत्न करण्यात आले होते. त्यांनतर अनेकदा पीडितने तडजोड केली. मात्र, यानंतरही सासरच्यांनी माझा छळ केला, असे आरोप तिने केले.

१५ डिसेंबर रोजी सासरच्यांनी तिला मारहाण केली. नवरा नाझिमने तिचे नाक चावले. यात ती गंभीर जखमी झाली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT