Ulhasnagar Crime News Saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime News: 5 मिनिटे थांबा म्हटल्याने तरुण संतापले, वस्तू बदलायला आलेल्या दोघांकडून व्यापारी पिता-पुत्रावर हल्ला

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये दोन तरुणांनी व्यापारी पिता-पुत्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच भागातील स्वामी शांती प्रकाश आश्रम रोडवर असलेल्या दुकानात ही घटना घडली

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News:

उल्हासनगरमध्ये दोन तरुणांनी व्यापारी पिता-पुत्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच भागातील स्वामी शांती प्रकाश आश्रम रोडवर असलेल्या दुकानात ही घटना घडली .या भागातील संतोष इलेक्ट्रॉनिक दुकानातील व्यापारी पिता-पुत्रांवर दोन तरुणांनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगरमधील संतोष इलेक्ट्रॉनिक दुकानात 2 जण वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी आले होते. तेव्हा कारण सुखेजा येथे बसला होता. दुकानातून घेऊंन गेलेला वस्तू बदलायला दोन व्यक्ती दुकानात आले.

व्यापाऱ्यांनी हे म्हटल्यावर दोघांनी पाच मिनिटे थांबा असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही तरुणांनी करणशी झटापट सुरू केली, एवढेच नाही तर दुकानासमोरून दुकानावर दगडफेक करून हल्लाही केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकानासमोर ठेवलेल्या काचेच्या सहाय्याने हल्लेखोरांनी काचेच्या साह्याने जीवघेणा हल्ला केला.हे सर्व पाहून करणचे वडील त्यांना मदत करायला गेले असता त्यांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात करणची नस कापली गेली.

करणला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच हिललाइन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन हल्लेखोरांविरुद्ध आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत. पोलीसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वाहनचालकावर प्राणघातक हल्ला

केडीएमसीचे वाहनचालक विनोद लकेश्री यांच्यावर धारदार शस्त्राने एका अनोळखी व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. ही घटना केडीएमसी विभागीय कार्यालयाजवळ घडली. धारदार शस्त्राने हल्ला करत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या नजीक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

लकेश्री यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एमआयडीसीतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हल्ला कुणी व का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस तपास करत आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

SCROLL FOR NEXT