Crime News Saam Tv
क्राईम

Ulhasnagar Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, भेटायचा प्लान अन्... उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती

अजय दुधाणे

उल्हासनगर, ता. २९ ऑगस्ट २०२४

बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे बदलापूर प्रकरणावरुन राज्यभरात मोर्चे आणि आंदोलने सुरु आहेत. अशातच उल्हासनगरमधून अत्याचाराची आणखी एका घटना समोर आली असून इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुली मुलांमध्ये ऑनलाईन मैत्रीचा ट्रेंड वाढला आहे. मात्र या मैत्रीचा गैरफायदा घेत काही आरोपींनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. उल्हासनगरातील अशाच एका प्रकरणाने पुन्हा एकदा शहरात खळबळ माजवली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवरून ओळख एका २२ वर्षीय तरुणाशी झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या या ओळखीचे रूपांतर नंतर भेटींमध्ये झाले. या भेटींच्या दरम्यान, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीच्या पोटात सतत दुखत असल्याने तिच्या पालकांनी तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. या प्रकरणाची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाईन चॅटिंगवर सतर्क राहणे आवश्यक आहे, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT