Wardha Crime Saam Tv
क्राईम

Shocking News: धक्कादायक! घरातून पळून गेले, विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ

Lovers Ended Their Lives: वर्धा जिल्ह्यातील पारडी गावात प्रेमीयुगुलांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे पळून गेले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wardha Crime News

वर्धा (Wardha) जिल्हा चांगलाच हादरला आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं.  (latets political news)

याप्रकरणी मुलीच्या पालकांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले (Lovers Ended Their Lives) आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार

पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला. पण, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ जानेवारीला तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या दिवशीपासून तळेगाव पोलीस या दोघांचाही शोध घेत होते.

विहिरीमध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेत

पारडी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. याची माहिती पारडीच्या पोलीस पाटलांना मिळाली. त्यांनी लागलीच तळेगाव पोलिसांना याबद्दल माहिती (Wardha Crime) दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर जाऊन मृतदेह विहिरी बाहेर काढले.

ओढणीने पाय बांधून विहिरीत उडी घेतली

विहिरीतून हे दोन्हीही मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाची चौकशी केली. तेव्हा बेपत्ता असलेल्या मुला-मुलीची ओळख पटली. दोघांनी ओढणीनं पाय बांधून विहिरीत उडी घेतल्याचं निदर्शनास आलं.

मृतदेह कुजलेले असल्यामुळं जागेवरच्च नातेवाईकांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात (Crime news) आलं. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात जमादार निखिल काळे, अतुल अडसड करीत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rabies Awareness: कोणकोणते प्राणी चावल्याने रेबीज होऊ शकतो?

Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

India Asia Cup 2025 Winner : भारताचा विजय 'तिलक'! पाकिस्तानचे वस्त्रहरण; २१ दिवसांत तिसऱ्यांदा पराभवाची चव चाखवली

BMC Election: मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुतीला यश मिळणार की ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार?

IND Vs PAK Final : ए चल... भारताला चौथा धक्का बसला अन् अबरार अहमदनं पुन्हा केलं वादग्रस्त सेलिब्रेशन, Video

SCROLL FOR NEXT