Hingoli Crime Saam tv
क्राईम

Nanded Crime: मुलींची छेड काढण्यावरून रात्री तामसा येथे दोन गटात वाद, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, चार जण जखमी

Nanded Tamsa Village News: नांदेड जिल्ह्यात तामसा गावात मुलींचा छेड काढण्याच्या प्रकरणावरुन दोन गटाच वाद झाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला.

Dhanshri Shintre

नांदेड जिल्ह्यातील तामसा गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळावर दगडफेकीची घटना घडली असून, पोलिसांच्या वाहनांनाही या टोळक्यांनी लक्ष्य केले. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

काय घडलं? तामसा गावात काल भाजी भाकरीच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत काही युवक मुलीची छेड काढत होते, असा आरोप केला जात आहे. या छेडछाडीवरून दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, ज्यामुळे गावात मोठा गोंधळ माजला. या संघर्षात चार जण जखमी झाले आहेत.

वादाची तीव्रता वाढत गेली आणि दोन्ही गटांनी तामसा शहरातील विविध भाजी-पाल्याच्या दुकाने तसेच इतर दुकाने नासधून केली. दुकानदारांची मालमत्ता पाडण्यात आली, तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे तामसा शहरातील वातावरण तणावपूर्ण होऊन गेले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले, पण ते अत्यंत कठीण होत होते.

तामसा गावात सध्या शांतता आहे, पण तणावपूर्ण वातावरण कायम आहे. या घटनेनंतर आज तामसा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून, येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनुशासनभंगाची शक्यता टाळण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यापुढे शांतता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण या घटनेने गावातील लोकांना धक्का दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT