Ahilyanagar Accident Saam Tv News
क्राईम

Accident News : भरधाव वाहनाची ट्रकला धडक, गाडीचं छप्पर उडालं, पुण्यात MPL बघायला आलेल्या जळगावच्या दोन मुलांचा मृत्यू

Ahilyanagar Accident : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पहाटेच्या सुमारास क्रूझर गाडीचा अपघात होऊन दोन ठार तर १२ जण जखमी झालेत. क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं गाडीचं छत अक्षरशः उडून गेलं.

Prashant Patil

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पहाटेच्या सुमारास क्रूझर गाडीचा अपघात होऊन दोन ठार तर १२ जण जखमी झालेत. क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं गाडीचं छत अक्षरशः उडून गेलं. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुलं MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुण्याला गेले होते. परतत असताना आज पहाटे नेवासा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झालाय. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला असून जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोदवड येथे आपल्या माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर उत्सळ दुमाला ता.नेवासा गावाच्या हद्दीत पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून डॅश केल्यानं क्रुझर गाडीमधील प्रथमेश तेली नावाचा आणि अजून अन्य एक मुलाचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. आणखी एक वृषभ सोनवणे नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे, त्याला साईदिप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे भरती केलं आहे.

दरम्यान, इतर ११ मुलांवर डॉ. पाटील हॉस्पिटल नेवासा फाटा येथे उपचार चालू आहे. सदरचा अपघात क्रुझर चालकाच्या चुकीमुळे झाला आहे. चालकावर गुन्हा नोंदवण्याचं कामकाज चालू आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस ठाणे नेवासा घटनास्थळावर हजर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT