delhi Crime  Saam Tv
क्राईम

Delhi Crime: एकाच वेळी 2 मुलांशी मुलगी करायची डेट; गुपित उघड होताच झाला ट्रायंगल प्रेमकहाणीचा भयानक अंत

Delhi Crime : अरमान खान, फैसल खान आणि समीर उर्फ ​​बालू अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अरमान असून त्याने बुधवारी रात्री उत्तर-पूर्व दिल्लीतील भागीरथी विहारमध्ये माहिरवर चाकूने ५० वेळा वार केले होते. माहिर आणि अरमान हे दोघे एकाच मुलीवर प्रेम करत होते.

Bharat Jadhav

Delhi Crime 20 Year Old Boy Brutally Stabbed :

दिल्लीतील गोकुळपुरी भागात धक्कादायक घटना घडलीय. एका तरुणावर तब्बल ५० वेळा चाकूचे वार करत त्याची हत्या करण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मृत २० वर्षीय तरुण एका तरुणीसोबत सोशल मीडिया साइटवर चॅट करत होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या तरुणाचं नाव माहिर उर्फ इमरान आहे.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार युवकाची हत्या ट्रायंगल लव्ह स्टोरीमुळे झालीय. पोलिसांनी युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक केलीय. पोलिसांना माहिरचा मृतदेह बुधवारी रात्री भागीरथी विहारमधील एका रस्त्याच्या बाजुला आढळून आला. अरमान खान, फैसल खान आणि समीर उर्फ बालू ,अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरमान हाच मुख्य आरोपी आहे.

अरमानने बुधवारी रात्री दिल्ली पूर्व भागातील विहारमध्ये माहिरवर ५० वेळा चाकूचा वार केला. यात माहिरचा मृत्यू झाला. माहिर आणि अरमान हे दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात होते. अरमानला जेव्हा माहिती पडलं की, माहिर सुद्धा त्याच मुलीसोबत बोलतो तिच्या प्रेम करतो. त्यावेळी अरमानने त्या मुलीसोबत भांडण केलं. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अरमानला कळालं की, मुलीच्या मनात माहिर आहे. त्याच वेळी माहिरचा त्या मुलीला व्हिडिओ कॉल आला. हे अरमानने पाहिलं त्याने तिच्याकडील हिसकावून घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसानंतर अरमानने माहिरला कॉल करत एका ठिकाणी बोलवलं. त्याच्या प्रेयसीचा मोबाईल परत करायचा आहे, असा बहाणा करत माहिरला एका ठिकाणी बोलवलं. जेव्हा माहिर त्याला भेटायला गेला तेव्हा अरमानने त्याच्यावर चाकू हल्ला केला. तब्बल ५० वार माहिरवर केले.

माहिरवर चाकूने अनेक वार करण्यात आले होते.तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी नमुने गोळा केले. घटनास्थळी एक चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT