Rajsthan Accident News Saam Tv
क्राईम

Accident News : भीषण अपघात! प्रवासी बस उलटून २ अल्पवयीन मुलींचा मृत्यू तर २८ जण गंभीर जखमी

Rajsthan Accident News : राजस्थानमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन निष्पाप मुलींचा जागीच मृत्यू झाला असून २८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • राजस्थानच्या पाली जिल्ह्यात भीषण बस अपघात

  • अपघातात दोन निष्पाप मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे

  • या अपघातात २८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत

  • चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला

  • या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत

राजस्थानमध्ये भयावह अपघात घडला आहे. निबेहेराहून जैसलमेरला जाणाऱ्या प्रवासी बसचा अपघात झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या अपघतात दोन निष्पाप मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील पाली जिल्ह्यात शनिवारी निबेहेराहून जैसलमेरला एक प्रवासी बस जात होती. या बसमध्ये महिला, मुले आणि वृद्धांसह सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. बस रोहत पोलीस स्टेशन परिसरातील खर्डा गावाजवळ तीव्र वळणावर येताच चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि गाडीने वेग पकडला. वेगात धावणारी बस पुढे जाऊन पलटी झाली.

अपघातानंतर रोहत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत २८ प्रवासी जखमी झाले. तर दोन निष्पाप मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही मुली ८ ते १० वर्षांच्या आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या पाली येथील बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने रस्ते सुरक्षेबद्दल आणि ग्रामीण रस्त्यांच्या स्थितीबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात चालकाचा निष्काळजीपणा आणि बसची खराब स्थिती हे अपघाताचे कारण असल्याचे आढळून आले आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आले असून बस जप्त करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पालीचे एसपी आदर्श सिद्धू आणि एडीएम बजरंग सिंह यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बांगर रुग्णालयात भेट दिली. एसपी सिद्धू यांनी सांगितले की ते या दुःखद अपघाताची सखोल चौकशी करत आहेत आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

SCROLL FOR NEXT