tokwada police arrests youth from pune and thane saam tv
क्राईम

Thane Crime News : आईसमवेत निघालेल्या युवकाचा रिक्षा चालकाशी झाला वाद, पुण्यासह ठाण्यातील युवकांना शस्त्रासह अटक

युवकाचा रिक्षावाल्याशी वाद झाला होता

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Thane News :

मुरबाड बाजारपेठेत तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या चार युवकांना ठाणे ग्रामीणच्या टोकवडा पोलिसांनी (tokwada police) बेड्या ठोकल्या. यातील एक युवक (youth) हा पुणे (pune) जिल्ह्यातला असून अन्य तिघे ठाणे (thane) जिल्ह्यातील असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.  (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुरबाड तालुक्यातील धसई बाजारपेठेत रिक्षाने आई समवेता निघालेल्या युवकाचा रिक्षावाल्याशी वाद झाला होता. त्यानंतर आईला घरी सोडून पुन्हा ताे आपल्या मित्रांना घेऊन रिक्षा चालकाला मारण्यासाठी शाेधू लागला.

काही युवक हे भर दुपारी धसई बाजारपेठत दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्याकडे तलावर असल्याची माहिती टोकवडा पोलिसांपर्यंत पाेहचली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी तत्काळ बाजारपेठेत धाव घेत चारही युवकांच्या मुसक्या आवळल्या.

पाेलिसांनी गणेश इरणाक (वय 18, रा. चिंचपुरे माळ मंचर ता. आंबेगाव जि. पुणे), सुनील ईरनक (वय 23 रा. सिंगापूर ता. मुरबाड जि. ठाणे), बाळू पारधी (वय 22 रा. सिंगापूर ता. मुरबाड जि. ठाणे), कुणाल ईरनक (वय 21 रा. सिंगापूर ता. मुरबाड जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचा भंग केला म्हणून (भा.द.स.क. 143,147,149,सह आर्म अॅक्ट 1959 चे कलम 425, महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार) गुन्हा दाखल केला. पुढील तपास टोकवडा पोलिस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT