Crime News Saam TV
क्राईम

Crime News : लहान भावाला मारलं म्हणून त्यांनी थेट त्याचं जीवन संपवलं; पुण्यातील थरारक घटना

Pune Crime News : पूर्ववैमनस्यातून आज देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये एका तरुणाची निघृण हत्या केलीये.

Ruchika Jadhav

पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी परिसरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पूर्ववैमनस्यातून आज देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये एका तरुणाची निघृण हत्या केलीये. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बारा वर्षाच्या लहान भावाला मारहाण केली म्हणून तीन तरुणांनी मिळून एका तरुणाला मारहाण करून त्याचा हत्या केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना घडली आहे.

या घटनेत विकी उर्फ शुभम परिहार या 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी हत्या केल्यानंतर शुभमचा मृतदेह मारुंजी येथील एका खदानीत टाकून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाची मदत घेऊन शुभमचा मृतदेह मारुंजी येथील खदानीतून शोधून काढला आहे.

शुभम परिहारच्या खून प्रकरणात चिखली पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीं पैकी एका आरोपीच्या बारा वर्षाच्या लहान भावाला शुभमने 26 तारखेला मारहाण केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी शुभम परिहारचा खून करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आलीये.

शुभम परिहारच्या कुटुंबियांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी आक्रोश व्यक्त केला. तसेच या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेवरून तरुणांमध्ये राग आणि बदला घेण्याची भावना किती तीव्र आहे हे लक्षात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT