three arrested-along with whale fish vomit worth rs 19 crore sangli crime news sml80 saam tv
क्राईम

Sangli : व्हेल माशाच्या उलटीसह काेकणातील तिघांना मिरजेत अटक, 19 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli Latest Marathi News : मिरज शहरातील म्हैसाळ रोडवर एक दुचाकी व चारचाकी मधून आलेल्या तिघांना पाेलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले.

विजय पाटील

Sangli :

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे व्हेल माश्याच्या उलटीचा (whale vomit) पदार्थ सांगली पोलिसांनी चाैघांकडून जप्त केला. त्याची किंमत बाजारात साधारणत: 19 कोटी 16 लाख 20 हजार इतकी असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी पाेलिसांनी सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील मालवण (malvan) येथील मंगेश शिरवडेकर, संतोष सागवेकर आणि वैभव खोबरेकर यांना अटक केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी (sunil phulari) यांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले सांगली जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानूसार मिरज शहरात सापळा रचण्यात आला.  (Maharashtra News)

मिरज शहरातील म्हैसाळ रोडवर एक दुचाकी व चारचाकी मधून आलेल्या तिघांना पाेलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पाेलिसांनी खाक्या दाखवताच व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून व्हेल माशाच्या उलटीच्या चार लाद्या हस्तगत केल्या. हा मुद्देमाल तब्बल 19 कोटी 24 लाखांचा असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed : ...नाहीतर तुझी बायको घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT