Beed Crime News Saam TV
क्राईम

Beed Crime News: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणानं केली चोरी; डोकं चक्रावणारं कारण आलं समोर

Crime News: आरोपी दीपक मुंडे हा अद्यापही उच्च शिक्षण घेत आहे. सोबतच तो पोलीस भरतीचीही तयारी करतोय. मागील अनेक वर्षांपासून भरती निघाली नाही. त्यातच इतरही काम मिळत नव्हते.

Ruchika Jadhav

Beed:

बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट सुटलाय. अशात मोबाईल घेण्यासाठी एका उच्च शिक्षित बेरोजगार तरुणाने कापूस आणि शेळ्यांची चोरी केलीये. शिक्षण घेऊनही नोकरी लागली नाही, हाताला कामधंदाही मिळत नव्हता. त्यातच मोबाइल घेण्यासाठी पैसेही नव्हते. म्हणून या तरुणाने चक्क शेतातील कापूस, शेळ्या अन् गॅस सिलिंडर चोरी केल्याचं समोर आले आहे.

बीड पोलिसांनी वडवाणी परिसरामध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यासह त्याच्या अल्पवयीन साथिदाराला अटक केलीय.दीपक असे पोलिसांनी पकडलेल्या तरुणाचे नाव आहे.

आरोपी दीपक मुंडे हा अद्यापही उच्च शिक्षण घेत आहे. सोबतच तो पोलीस भरतीचीही तयारी करतोय. मागील अनेक वर्षांपासून भरती निघाली नाही. त्यातच इतरही काम मिळत नव्हते. त्यामुळे त्याला खर्च करण्यासाठी पैसे मिळत नव्हते. त्यातच सर्व मित्रांच्या हाती महागडे मोबाइल आहेत. आपल्यालाही तसा मोबाइल हवा, मात्र पैसे नसल्याने तो चिंतेत होता. यातूनच त्याने शेतातील कापूस चोरीचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात वडवणी तालुक्यातील एका शेतातील घरातून कापूस, शेळ्या, गॅस सिलिंडर असा 66 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. अशाच घटना पिंपरखेर परिसरातही घडल्या होत्या. वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला.

कापूस चोरीचे प्रकार वाढत असल्याने बीड एलसीबीने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. यादरम्यान सीसीटीव्ही व इतर लोकांशी संपर्क साधून चोरट्याला त्यांनी पकडले आहे. दरम्यान त्याच्याकडून कापूस जप्तीसह इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT