Thane News Saam tv
क्राईम

Thane News : मुंब्य्रात टोइंग कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला; पायावरून चालविली दुचाकी, मोबाईलमध्ये घटना कैद

Thane News : स्थानकाच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला टोईंग करत असताना दानिश आणि त्याच्या एका साथीदाराने मिळून टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

Rajesh Sonwane

हिरा ढाकणे 
ठाणे
: ठाणे शहरातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी टोईंग करत असताना दोन तरुणांनी टोइंग कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला (Crime News) केला. इतकेच नाही तर संतोष रॉय नावाच्या कर्मचाऱ्यावर युवकांनी दुचाकी (Thane) चालवत त्याच्या पायावर चाकूने हल्ला केला. त्यामुळे संतोष जखमी झाला. तसेच टोइंग वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली. (Tajya Batmya)

टोईंग कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाही. असाच प्रकार मुंब्रा (Mumbra) स्थानकाजवळ घडला आहे. स्थानकाच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला टोईंग करत असताना दानिश आणि त्याच्या एका साथीदाराने मिळून टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. तसेच टोईंग वर चढला व व्हॅन आणून गाडी उतरवली. दरम्यान संतोष नावाच्या कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दानिशने टोईंग कर्मचाऱ्याच्या पायावर दुचाकी चालवली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांवर गुन्हा दाखल 

सर्व टोईंग कर्मचारी वाचवण्यासाठी पुढे सरसावले असता तरुणाने चॉपर बाहेर काढले. यानंतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जखमी टोइंग कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दानिश आणि त्याच्या अन्य साथीदाराविरुद्ध (Police) मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वास्तू शास्त्रानुसार 'या' ३ संकेतांकडे दुर्लक्ष करू नये

SCROLL FOR NEXT