Breakup depression SAAM TV
क्राईम

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

Breakup depression: अलिबागमध्ये प्रेमप्रकरणातून नैराश्यात गेलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार मिळाल्यामुळे तो मानसिक तणावाखाली गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रेमप्रकरणातून नैराश्य आलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायगडच्या अलिबागमधून समोर आलीये. अक्षय युवराज निकाळे वय वर्ष 30 मूळ राहणार नाशिक असं मृत तरुणाचं नाव आहे. अक्षयचे अलिबागमधील एका परप्रांतीय व्यापाऱ्याच्या मुलीसोबत दहा वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सदर तरुणीने लग्नास नकार दिल्याने अक्षय धक्का बसला आणि तो नैराश्यातून मानसिक तणावात गेला. या धक्क्यातून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचं नाव अक्षय निकाळे असं असून तो मूळचा नाशिकचा राहणार होता. काही काळापासून तो अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचे एका तरुणीसोबत जवळपास दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघंही एकमेकांना चांगलं ओळखत होते आणि त्यांच्या नात्याबाबत घरच्यांनाही माहिती होती, अशी चर्चा परिसरात आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी या नात्यात तणाव निर्माण झाला. संबंधित तरुणीने लग्नास नकार दिला. या निर्णयाचा अक्षयवर मोठा परिणाम झाला. तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली आणि खूपच खचलेला दिसत होता, असं त्याच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं. या सगळ्या परिस्थितीतून तो नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

गळफास घेत केली आत्महत्या

घटनेच्या दिवशी अक्षय नाशिकला एका कार्यक्रमासाठी गेला होता. तिथून परत आल्यानंतर अलिबागमधील राहत्या घरी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी मृतदेह अलिबाग जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय.

या घटनेत आणखी एक बाब समोर आलीये. आत्महत्येपूर्वी अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो जवळ ठेवल्याची माहिती आहे. यावरून या नात्याचा त्याच्यावर किती खोल परिणाम झाला होता, हे स्पष्ट होतं. ब्रेकअपचा धक्का संपल्याचा धक्का तो सहन करू शकला नाही, अशी चर्चा आहे.

दरम्यान या प्रकरणी प्रसाद रमेश गुरव यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

Constipation Relief: 30 मिनिटांत पोट होईल साफ, फॉलो करा हे रुटीन

SCROLL FOR NEXT