A 14-year-old minor victim ended her life after a brutal gang-rape incident involving her boyfriend Saam Tv
क्राईम

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, नंतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार; 14 वर्षीय पीडित मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं

Minor Girl Ends Life After Sexual Assault: प्रेयसीला घरी बोलावून प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनी १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या धक्क्यातून पीडितेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले

Omkar Sonawane

एका नराधमाने त्याच्या 2 मित्रांच्या साथीने त्याच्याच प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास याने त्या मुलीला आपल्या घरी बोलावले आणि तिला ओलीस ठेवले. त्यानंतर या तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली. हे कळताच हे तिघे त्या ठिकाणहून फरार झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता त्या मुलाची आई घरी आली तेव्हा ती मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली होती. यावेळी त्या आईने लोकांच्या मदतीने तिला घरी पाठवले. त्यानंतर तिला तब्बल 2 तासांनी ती शुद्धीवर आली. तिला सगळ्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली असतान ती एकदम सुन्न झाली होती. त्यानंतर तिने तिच्या रूममध्ये जाऊन विशप्राशन केले.

घरच्यांनी लेगेचच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण काही वेळातच तिने प्राण सोडले. यावेळी तिच्या घरातील सदस्यांनी मोठा राडा केला तेव्हा तिचे पोस्टमार्टम केले. त्यानंतर तिचा मृतदेह सोपवण्यात आला. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली असून दोन आरोप आद्यप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये 25 जानेवारीच्या रात्री आरोपीने मुलीला फूस लाऊन आपल्या घरी बोलावले. घरी येताच तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. तशाच अवस्थेत ती नंतर घरी पोहोचली आणि आई वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितला त्यानंतर तिने विश घेऊन स्वतःचे जीवन संपवले.

तिच्याच कुटुंबाने मारहाण केली- आरोपीची आई'

आरोपीच्या कुटुंबाने सांगितले की मुलीला तिच्याच घरातील सदस्यांनी मारहाण केली. मुलाच्या आईने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की मुलीवर बलात्कार किंवा विषबाधा झाली नाही. त्यांनी सांगितले की रात्री मुलीला तिच्या घरी सुरक्षित मीच सोडले. मुलीला तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली, त्यानंतर तिने विषारी प्राशन केले. त्यांनी सांगितले की त्यांनी मुलीच्या उपचारासाठी पैसेही दिले होते. आता आम्हाला अडकवण्याचा कट रचला जात आहे. या सर्व घटनेचा तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सुनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT