Teacher Fraud Saam Tv
क्राईम

Teacher Fraud: मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, पालकांकडून चौकशीची मागणी; भंडाऱ्यातील संतापजनक घटना

Fraud On Student Supplementary Food: भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचं उघड झालं आहे. या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Student Supplementary Food Fraud Bhandara

सरकार शाळेत मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना पोषण आहार (Student Supplementary Food) पुरवतो. पण अनेकदा हा आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोच असं नाही. बऱ्याचदा यामध्ये फसवणुकीच्या घटना देखील घडतात. भंडारा जिल्ह्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

भंडारा जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या पूरक आहारावर शिक्षक डल्ला मारत (Student Supplementary Food Fraud) असल्याचा प्रकार सध्या सुरू आहे. पोषण आहारासोबत मुलांना पूरक आहार म्हणुन आठवड्यातून एकदा अंडी, किंव्हा केळी देणं बंधनकर आहे. परंतू लहान मुलाना पूरक आहार न देता त्याची बिले जिल्हा परिषदेकडून वसुल करून घेतली जात आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की काय आहे प्रकरण

पूरक आहारासाठी जिल्हा परिषदेकडून प्रती विद्यार्थी पाच रूपयांप्रमाणे शासन निर्णयानुसार पैसा दिला जातो. या पैशातून मुलांना पूरक आहार न देता भंडारा जिल्ह्यातील शिक्षक तो पैसा स्वत:च्या खिशात घालताना दिसत (Teacher Fraud On Student Supplementary Food) आहे.

कुपोषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी शाळांमध्ये मुलांना पोषण आहार दिला जातो. लहान मुलांना पोषण आहारासोबतच पूरक (Bhandara) आहार देण्यात येत आहे. आठवड्यातून एकदा बुधवारी अंडी, केळी दिली जाते. प्रती अंडी 5 रूपये दराने शासन प्रत्येक शाळेला पैसा देते. मात्र, याच पूरक आहारावर आता शिक्षकच डल्ला मारत असल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्राथमिक शाळेत (Primary School Dewhadi) उघड झाला आहे.

पालकांनी केली चौकशीची मागणी

शिक्षक मुलांना पोषण आहार देतात मात्र, अंडी व केळी देत नाही. एका शिक्षकांचा सेवानिवृत्ती असल्याने त्याच दिवशी अंडी दिली असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. पालकांनी सुध्दा या चौकशीची मागणी केली (Teacher Fraud) आहे. या घटनेमुळे पालक वर्गात संताप दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार अनुदानीत शाळेत मुलाना अंडी देणं बंधनकारक आहे. शासन त्या शाळेला 5 रूपये दराने पैसे सुध्दा देत आहे. जर शाळेत विद्यार्थ्यांना अंडी दिली जात नसेल, तर याची चौकशी करुन पुढील कारवाई केली जाणार असल्याचं शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT