Sangali Crime saam tv
क्राईम

Shocking : पोलिसांची नजर चुकवली, गळ्याला वायर लावली, पोलीस ठाण्यात आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

Sangali Crime : सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्यात ताब्यात असलेल्या प्रकाश चव्हाण या संशयित चोराने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Alisha Khedekar

  • विटा पोलीस ठाण्यात ताब्यातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • प्रकाश चव्हाण (४०) हा आरोपी असून त्याला चोरी प्रकरणी अटक झाली होती.

  • घटनेनंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सांगली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात ताब्यात असलेल्या एका संशयित चोराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणामुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेवर आणि संशयितांवरील देखरेखीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रकाश चव्हाण (वय ४०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चोरीच्या प्रकरणी प्रकाश याला विटा पोलिसांनी अटक केली होती. चव्हाण याच्यावर ठाण्यात चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान त्याने अचानक पोलीसांची नजर चुकवली आणि ठाण्यातच असलेल्या एका खोलीत गेला. तिथे असलेल्या विद्युत उपकरणाची वायर त्याने आपल्या गळ्याला आवळून फास घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना इतक्या वेगाने घडली की पोलिसांनाही याचा पत्ता लागला नाही.

काही क्षणांनंतर पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्यांनी तातडीने चव्हाणला खाली सोडवत विट्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांकडून सतत देखरेख ठेवली जात आहे.

या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. प्रकाश चव्हाण याने अशा टोकाच्या पावलाचे कारण काय असावे, याचा तपास पोलीस करत आहेत. चौकशीदरम्यान मानसिक तणावामुळे त्याने असा निर्णय घेतला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT