Crime News X
क्राईम

Crime : मादक पेय पाजलं, बेशुद्धीच्या अवस्थेत गैरफायदा उचलला; भाजप पदाधिकाऱ्याचा मित्रासह तरुणीवर सामूहिक अत्याचार

Crime News : मुलीला मादक पेय पाजून हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी पदाधिकाऱ्याच्या मित्राला देखील ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

एका मुलीला मादक पेय पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. सदर घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली आहे. सुरतमधील जहांगीरपुरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील वेड रोड परिसरात राहणारी २३ वर्षीय तरुणी काल रात्री एका ओळखीच्या व्यक्तीसोबत कारने सुवाली समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. रात्रीच्या सुमारास घरी परतली. घरी गेल्यानंतर मुलगी रडू लागली, ती चालण्याच्याही स्थितीत नव्हती. जेव्हा कुटुंबियांनी विचारपूस केली, तेव्हा पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आदित्य उपाध्याय आणि त्याचा मित्र गौरव सिंग राजपूत यांच्यासह पीडित मुलगी सुवाली समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. तिथे गेल्यानंतर तिला मादक पेय पाजण्यात आले. यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला जहांगीरपुरा कॅनाल रोडवरील हॉटेल ग्रीनमध्ये नेले. हॉटेलच्या रुमवर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी पीडितेला तिच्या घरी सोडले.

संपूर्ण प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने तात्काळ जहांगीरपुरा पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना घडलेली संपूर्ण प्रकार सांगितला. मध्यरात्री उशिरा पोलिसांनी आदित्य आणि गौरव यांना अटक केली. आदित्य उपाध्याय हा भाजप सुरत शहरातील वॉर्ड क्रमांक ८ चा सरचिटणीस म्हणून कार्यरत होता. ही घटना समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. आदित्य, गौरव आणि पीडित मुलगी यांच्यामध्ये चांगली ओळख होती. तिघेही सोशल मीडियावरही बोलत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून मुलगी बाहेर फिरायला गेली. मादक पेय पाजून तिचा गैरफायदा घेतला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दहीहंडी उत्सवादरम्यान एका गोविंदाचा मृत्यू

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का, ठाकरेंच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

Gautami Patil Video: सबसे कातील गौतमी पाटील! स्टेजवर पाय ठेवताच गोविंदांचा एकच जल्लोष; जबरदस्त ठुमके एकदा बघाच

Dog Lovers: पुण्यात श्वानप्रेमींचा संताप उसळला; कोर्टाच्या आदेशाविरोधात रस्त्यावर आंदोलन|VIDEO

Minio Green: भारतीय बाजारात धडकणार नॅनोपेक्षा लहान मिनी इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या दमदार फिचर्स

SCROLL FOR NEXT