Crime News Saam tv
क्राईम

Crime News : नवरा-बायकोच्या वादात सासऱ्याचा जीव गेला, सासुरवाडीत क्षुल्लक कारणामुळे राडा

Crime News : जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात तिसऱ्याचा जीव गेल्यामुळे खळबळ उडाली आहे

Namdeo Kumbhar

Crime News in Marathi : बायकोला आणायला सासुरवाडीला गेला, पण तिथे गेल्यानंतर शुल्लक काराणामुळे बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की, जावयाने सासऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना राजस्थानमधील बूंदी जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जावई पत्नीला आणण्यासाठी सासुरवाडीला गेला होता, त्यावेळी वाद झाला, त्यातूनच ही घटना घडली.

गेल्या काही दिवसांपासून आरोपी बायको आणि मामा सासऱ्यावर नाराज होता. त्यातच बायको अचानक माहेरी गेली, त्यामुळे त्याचा राग आणखी वाढला. तो बायकोला आणण्यासाठी सासुरवाडीला गेला. त्यावेळी मामांसोबत त्याचा वाद झाला. रागाच्या भरात ३८ वर्षीय जावयाने सासऱ्याचा खून केला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला अन् जावयाला बेड्या ठोकल्या.

येथील केशवराईपाटण शहरातील झोपडपट्टी परिसरात रविवारी ही घटना घडली. कौटुंबिक कारणावरून जावयाने मामाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. हंसराज मीना यांनी याचा तपास सुरू केला.

सकाळी सकाळी कुटुंबात जोरदार वाद सुरू झाला होता. त्यावेळी संतापलेल्या जावई शहजाद याने चाकूने हल्ला करून कल्लू खान याची हत्या केली. या हल्ल्यात कल्लूची पत्नी शाहजहानही जखमी झाली आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम कोटा एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात करण्यात आलेय. जखमी शाहजहानवरही उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT