Solapur Pregnant Woman Commits Suicide Saam Tv News
क्राईम

Solapur Crime : मला माफ करा, माझ्यात...; प्रसुती ८ दिवसांवर, गर्भवती महिलेनं आयुष्य संपवलं, सोलापूरमध्ये हळहळ

Solapur Pregnant Woman Commits Suicide : रुक्मिणी आणि सुरज या दोघांचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. विवाहानंतर रुक्मिणी गर्भवती राहिली आणि या महिन्यात तिची प्रसुती होणार होती.

Prashant Patil

सोलापूर : सोलापूरमध्ये नामवंत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून काल अजून एक घटना घडली. विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधील एका चिमुकलीला बाहेरील अनोळखी माणसाने दगड मारल्याने त्यात या चिमुरडीचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांना पाच दिवस उलटत नाही तोवर जिल्ह्यातून तिसरी घटना समोर आली आहे. एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेनं चिठ्ठी लिहून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला आहे.

नऊ महिन्यांच्या गरोदर आईने फेट्याच्या साहाय्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना काल सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील टकले वस्ती येथे घडल्याची माहिती मिळाली आहे. रुक्मिणी सुरज टकले असं मृत गरोदर मातेचं नाव असल्याची माहिती आहे. मृत महिलेचा पती सुरज सीताराम टकले यांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुक्मिणी आणि सुरज या दोघांचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. विवाहानंतर रुक्मिणी गर्भवती राहिली आणि या महिन्यात तिची प्रसुती होणार होती. डॉक्टरांनी येत्या २९ एप्रिल रोजी प्रसुतीची तारीख दिली होती. गळफास घेण्यापूर्वी रुक्मिणी टकलेने 'मला माफ करा, माझ्यात कोणताच चांगला गुण नाही', अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. काल सोमवारी एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लाल रंगाच्या फेट्याने तिने गळफास घेतला.

काल दुपारी कुटुंबीय रुक्मिणीला जेवणासाठी बोलवत होते. कुटुंबीयांनी बेडरुमचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दीर स्वप्नील टकले यांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता वहिनी रुक्मिणीने गळफास घेतल्याचं दिसलं. ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेनं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगोला ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मृत रुक्मिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT