Solapur girl kidnapped Saam Tv News
क्राईम

Solapur Crime : बस स्टँडवरुन ३ वर्षीय चिमुकलीला पळवलं, दागिने काढून काही अंतरावर सोडलं; 'तो' धागा महत्त्वाचा ठरला

Solapur Crime News : बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचं लग्न मोडनिंबमधील एका मंगल कार्यालयात सुरू होते. अक्षता कार्यक्रमात चिमुरडी जोरजोरात रडायला लागली. वऱ्हाडींचं लक्ष त्या चिमुरडीवर गेलं.

Prashant Patil

सोलापूर : मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीला एका अनोळखी महिलेनं फसवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत, संबंधित महिलेनं तिला मोडनिंब येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात सोडून दिलं. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर केवळ सहा तासात चिमुकलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं.

बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचं लग्न मोडनिंबमधील एका मंगल कार्यालयात सुरू होते. अक्षता कार्यक्रमात चिमुरडी जोरजोरात रडायला लागली. वऱ्हाडींचं लक्ष त्या चिमुरडीवर गेलं. तिला विचारले असता, ती फक्त 'मी सोलापूरची आहे' एवढंच सांगत होती. यानंतर राजाभाऊ माळी यांनी तिचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सोलापूर बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी वेळ न दवडता तपास सुरू करत केवळ सहा तासांत मुलीचा शोध घेतला आणि आई वडिलांच्या स्वाधीन केलं.

सोलापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक

ही कामगिरी फौजदार चावडी पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, एपीआय शंकर धायगुडे, एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस अजय चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल. अमोल खरटमल सुरज सोनवलकर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG price : मोठी बातमी! सांगलीत व्यवसायिक गॅसची किंमतीचा स्फोट, वाहनांच्या एलपीजी मोठी वाढ

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

SCROLL FOR NEXT