Solapur Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : धक्कादायक! मंगळसूत्रावरून जावा-जावांची भांडणं, मोठीनं छोट्या जावेचा जीव घेतला अन्...

Solapur Crime News : सोलापुरात दागिन्यांच्या वादातून मोठ्या जावेने छोट्या जावेची हत्या करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माढा पोलिसांच्या तपासात कट उघडकीस आला आहे.

Alisha Khedekar

  • दागिन्यांच्या वादातून मोठ्या जावेने छोट्या जावेची हत्या केली

  • पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला

  • माढा पोलिसांच्या तपासात कट उघडकीस आला

  • बार्शी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

विश्वभूषण लिमये, सोलापूर

कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड हे लागतच मात्र छोट्या छोट्या कारणांवरून मारहाण करणं हे योग्य नाही. हे कधीही जीवावर बेतू शकत. अशीच एका हादरवणारी घटना सोलापूरमध्ये घडली. दागिने ठेवण्याच्या कारणावरून दोन जावांमध्ये टोकाचं भांडण झालं. या भांडणातून मोठ्या जावेने छोट्या जावेचा गळा दाबून हत्या केली. शिवाय तिचा मृतदेह देखील जाळून टाकला. याप्रकरणी आता न्यायालयाने मोठ्या जावेला दोषी ठरवलं आहे. शिवाय तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गीता पाडुळे असं शिक्षा झालेल्या महिलेचं नाव आहे. तर उज्वला पाडुळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. मृत उज्ज्वला पाडुळे हिचं लग्न २९ नोव्हेंबर २०२२ रोजी किरण पाडुळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी उज्वला माहेरी गेली. जाताना तिने आपले मंगळसूत्र आणि हातातील सोन्याची अंगठी घरातील कपाटात ठेवली होती. मात्र, माहेरून परत आल्यावर तिला तिचे दागिने कपाटात आढळून आले नाहीत. यावरून उज्ज्वला आणि तिची थोरली जाऊ गीता यांच्यात जोरदार भांडण झाली. आपल्यावर चोरीचा आळ घेतल्याचा राग गीताच्या मनात होता.

याचं रागातून गीताने २ फेब्रुवारी २०२३ रोजी याच रागातून उज्ज्वलाची घरातच गळा आवळून हत्या केली. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिने उज्ज्वलाचा मृतदेह घरातच पेटवून दिला. एवढ्यावरच न थांबता, हे कृत्य अज्ञात व्यक्तीने केल्याचा बनाव रचण्यासाठी गीताने स्वतःच्या अंगावर देखील चाकूने वार करून घेतले. पण पोलिसांनी सविस्तर तपास केला असता गीताचं बिंग फुटलं.

माढा पोलिसांनी या प्रकरणी सविस्तर तपास केला. तपासादरम्यान गीताने रचलेला कट उघड झाला. पोलिसांनी याप्रकरणी भक्कम पुरावे गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून, न्यायालयाने गीता पाडुळे हिला जन्मठेप आणि दंड सुनावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT