Crime News Saam tv
क्राईम

Crime : मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, असं काही केलं की पोलीस लागले मागे

Bihar News : बिहारमध्ये भाऊजी आणि मेहुणीच्या जोडीची जोरदार चर्चा होत आहे. मेहुणीच्या पराक्रमामुळे पोलीस भाऊजींचा शोध घेत आहेत. लग्नावेळी मेहुणीने अपलोड केलेल्या फोटोमुळे पोलीस भाऊजीचा शोध घेत आहेत.

Namdeo Kumbhar

Crime News : सोशल मीडियाच्या जगात लाईक्स अन् कमेंट्ससाठी कोणत्याही स्तराला लोक जातात, याच्या अनेक बातम्या समोर आल्या. बिहारमध्येही असेच काहीसे घडलेय. लाइक्स अन् कमेंट्ससाठी भाऊजी आणि मेहुणीने जे काही केलं, त्यामुळे पोलीस त्यांचा मागे लागले आहेत. लग्नावेळी मेहुणीने पिस्टलसोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला, त्यामुळे पोलीस भाऊजीचा शोध घेत आहेत.

भाऊजीला खूश करण्यासाठी मेहुणीने असं काही केलं की पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. लग्नाच्या समारंभात मेहुणीच्या एका कृत्याने भाऊजीवर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे. इंडो-नेपाळ बॉर्डर वरील झारोखर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बागा गावात मेहुणीने भाऊजीकडील परवानाधारक बंदुकीसोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये बंदूक मेहुणीच्या हातात दिसत आहे, हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. त्यानंतर एसपी स्वारन प्रभात यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.

प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, बालपूर येथील अभय सिंह यांनी आपली परवानाधारक बंदूक मेहुणीला दिली. तिने त्यासोबत फोटो काढले अन् सोशल मीडियावर ठेवले. यामुळे अभय सिंह अडचणीत आलाय. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभय सिंह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या मते, आरोपीला अटक केली जाईल आणि सर्व तथ्यांचा तपास केला जाईल. या शस्त्राच्या परवान्यातही चौकशी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT