Sindhudurg Kudal Siddhivinayak Bidwalkar killed case Saam Tv News
क्राईम

Sindhudurg Crime : बिडवलकरची हत्या, सिंधुदुर्गचा आका कोण? अमानुष हत्येनं बीडपाठोपाठ सिंधुदुर्ग हादरलं

Sindhudurg Kudal Murder Case : बीडनंतर सिंधुदूर्गातही मृत्यूचा थरकाप उडवणारी हत्या घडलीय. मात्र ही हत्या कुणी केलीय? या प्रकरणातील मारेकऱ्यांचा आका कोण? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टीव्ही

सिंधुदुर्ग : सरपंच संतोष देशमुखांच्या क्रुर हत्येनं महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असतानाच सिंधुदुर्गच्या कुडाळमधून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय. सिद्धेश शिरसाट आणि त्याच्या साथीदारांनी सिद्धीविनायक बिडवलकरचं अपहरण करुन अत्यंत अमानुषपणे हत्या केली. त्यामुळेच सिंधुदुर्गची अवस्था बीडपेक्षा भीषण असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वैभव नाईकांनी केलाय.

प्रकाश बिडवलकर हत्येचा घटनाक्रम

मार्च 2023

सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचं अपहरण

9 एप्रिल 2025

जीवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची नातेवाईकांची तक्रार

10 एप्रिल 2025

पोलिसांकडून 4 आरोपींना अटक

आरोपी सिद्धेश शिरसाटसह ३ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच सिद्धेश शिरसाट पोपटासारखा बोलायला लागला. यावेळी राक्षसी प्रवृत्तीच्या शिरसाटने बिडवलकरच्या हत्येची कबुलीच दिलीय.

पैशांच्या वादातून बिडवलकरचं अपहरण

बिडवलकरला सिद्धेश शिरसाटच्या घरी नेण्यात आलं

शिरसाटने बिडवलकरला नग्न करत मारहाणीचा व्हिडीओ बनवला

मारहाणीदरम्यान बिडवलकरचा मृत्यू

मृत्यूनंतर बिडवलकरची मृतदेह सातार्डा जंगलात जाळला

राख पोत्यात भरुन नष्ट केली आणि हाडं नदीत फेकली

मृत्यूचा थरकाप उडवणाऱ्या हत्येनंतर संतापलेल्या संजय राऊतांनी सिंधुदुर्गच्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय. तर निलेश राणेंनी वैभव नाईकांच्याच चौकशीची मागणी केलीय. हे असं असलं तरी इतक्या अमानुषपणे हत्या करण्याचं धाडस येतं कुठून? अशा हैवानी वृत्तीच्या आरोपींना २ वर्षापर्यंत अभय कुणी दिलं? या सिंधुदुर्गमधील आरोपींचा आका नेमका कोण आहे? याचा शोध घेऊन आरोपींपाठोपाठ त्यांना पाठीशी घालणारं पोलीस प्रशासन आणि त्यांचा आकाच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT