crime news Saam Tv
क्राईम

Crime News: प्रियकरासाठी नवऱ्याचा बळी; 5 वर्षात 785 बायकांनी पतीला संपवलं

Husband killing cases In Five Years: गेल्या 5 वर्षात महिलांकडून नवऱ्याच्या हत्यांची मालिकाच सुरु आहे... याच नवऱ्यांच्या हत्येसंदर्भात धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झालाय. नेमकं किती महिलांनी नवऱ्यांची हत्या केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीला बायको सोनमनं प्रियकराच्या मदतीनं खोल दरीत ढकलून दिलं.. आणि त्यानंतर अपहरण झाल्याचा बनाव केला. मेरठच्या मुस्काननं प्रियकर साहिलच्या मदतीनं नवऱ्याचे तुकडे करून त्याला ड्रममध्ये भरले. ऐश्वर्यांनं आपलं लग्न झाल्यानंतर महिन्याभरातच बॉयफ्रेंडच्या मदतीनं पती तेजेश्वरची सुपारी देऊन हत्या केली

हरियाणात युट्यूबर असणाऱ्या रवीनानं प्रेमसंबंधामुळे पती प्रवीणची गळा दाबून हत्या केली आणि कालव्यात त्याचा मृतदेह फेकून दिला. महिलांच्या क्रूरतेच्या अशा एक ना अनेक घटनांनी संपूर्ण देश हादरलाय...त्यातच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालामधून आलेली आकडेवारी तर धक्कादायकच आहे. गेल्या 5 वर्षात तब्बल 785 महिलांनी आपल्या नवऱ्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचं समोर आलंय..

सनम बेवफा!

दरवर्षी 275 पुरुषांची पत्नीकडून हत्या

60% महिला प्रियकराकडून पतीची हत्या करतात

2010- 2014 पर्यंत प्रेमप्रकरणाशी संबंधित हत्यांचं प्रमाण 7 ते 8%

2015- 22 पर्यंत ही आकडेवारी 10 ते 11%

दरम्यान या अहवालानुसार प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.

१) उत्तर प्रदेश

बायकोच्या अफेअर्समुळे 275 नवऱ्याची हत्या

२) बिहार

पाच वर्षांत बिहारमध्ये 186 नवऱ्यांची हत्या

३) राजस्थान

बायकोमुळे 138 नवऱ्यांची हत्या

४) महाराष्ट्र

बायकोच्या अफेअर्समुळे 100 नवऱ्यांची हत्या

५) मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात पत्नीकडून पतीच्या हत्येच्या 87 घटना

“इश्क और जंग में सब जायज है” हे वाक्य प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडणाऱ्या अनेकांना लढण्याचं बळ देतं.. मात्र प्रेमाच्या नावाखाली घडणाऱ्या या क्रूर हत्यांनी समाजाला हादरवलयं. मुळात सात जन्माची साथ देण्यासाठी एकमेकांचे हात धरणारे पती-पत्नी अचानक एकमेंकांचा द्वेष करू लागतात. तेव्हाच अशा विकृत मानसिकतेचा जन्म होतो. यासाठी एकमेंकाशी संवाद साधणं,व्यक्त होणं, मानोसउपचार तज्ज्ञाची मदत घेणं गरजेचं आहे. कारण विकृत मानसिकता तुमच्यावर स्वार होऊन नात्याचा शेवट करू शकते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT