crime news Saam tv
क्राईम

Shocking : भर बाजारात नवऱ्याने बायकोवर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमध्ये वैवाहिक वादातून पत्नीवर पतीने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना गजबजलेल्या बाजारपेठेत घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • गोरखपूरमध्ये वैवाहिक वादातून पत्नीवर पतीचा गोळीबार

  • फोटो स्टुडिओजवळील घटनेने बाजारपेठेत खळबळ उडाली

  • १३ वर्षांच्या मुलीवर आईच्या मृत्यूचा मोठा आघात

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला

उत्तर प्रदेशातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. वैवाहिक वादातून संतप्त झालेल्या पतीने गजबजलेल्या बाजारपेठेतच पत्नीवर गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली.मृत महिलेचं नाव ममता उर्फ मुक्ति चौहान असून आरोपी पतीचं नाव विश्वकर्मा चौहान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील जेल रोड परिसरातील एका फोटो स्टुडिओजवळ ही धक्कादायक घटना घडली. रात्री साधारण आठ वाजण्याच्या सुमारास ममता उर्फ मुक्ति चौहान नावाची महिला फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये गेली असता तिचा पती विश्वकर्मा चौहान तिथे पोहोचला. दोघांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर विश्वकर्माने पिस्तूल काढली आणि थेट पत्नीच्या छातीत गोळी झाडली.

रक्ताने माखलेल्या ममताला स्थानिकांनी तत्काळ विनायक रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर ती आधीच मृत झाल्याचं घोषित केलं. घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला होता. पण पोलिसांनी त्वरीत शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वकर्मा आणि ममता यांचं लग्नाला दहा वर्षे झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांचे संबंध बिघडले होते. मालमत्तेच्या वादामुळे ते दीड वर्षांपासून वेगळं राहत होते. ममता खजनीची रहिवासी असून ती बँक रोडवरील एका खाजगी कंपनीत काम करत होती. तिला १३ वर्षांची मुलगी आहे.

या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शस्त्र जप्त केलं असून, आरोपीकडून घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोरखपूर पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवून पुढील चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT