Hingoli News Saam Tv
क्राईम

Hingoli Crime : पोलिसांच्या कानशिलात मारली, दगडाने हल्ला केला, घटनेचा थरार व्हायरल

Hingoli News : हिंगोलीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आरोपीला जामिनावर सोडल्याने पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

Alisha Khedekar

  • हिंगोलीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे.

  • आरोपी रवींद्र समुद्रेवारने पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावून दगडाने हल्ला केला

  • ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपीला जामिनावर सोडण्यात आले आहे.

  • या घटनेने पोलिसांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात नागरिकांचं रक्षण करणाऱ्या पोलिसावरच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच हिंगोलीमध्ये वाद मिटवण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव भगीरथ सवंडकर आहे. तर आरोपीचे नाव रवींद्र कुमार समुद्रेवार असे आहे. या घटनेनंतर पोलीसचं सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचं काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवंडकर हे शेतीचा वाद मिटवण्यासाठी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कुरुंदा टी पॉइंट वर गेले होते. यादरम्यान हा वाद इतका टोकाला गेला की तिथे उपस्थित रवींद्रने कुमारने पोलिसांना मारहाण केली.

सदर घटना ही ४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आरोपी रवींद्रने पोलीस कर्मचारी सवंडकरांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी रविंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात कुरुंदा पोलिसांनी आरोपी विरोधात कठोर कार्यवाही न करता आरोपीला जामिनावर सोडून देण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच हिंगोली जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी असुरक्षित आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT