संदीप नागरे, साम प्रतिनिधी
हिंगोलीमध्ये प्रेम प्रकरणांमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली तालुक्यातील एका गावातून 18 वर्षाची तरुणी आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. तिच्या प्रियकराने तिला प्रेमाचं खोटं अश्वासन देऊन तिला लग्नाचे आमिष दाखवलं. दोन महिन्यांपूर्वी पळवून नेलं होतं. आवडत्या मुलासोबत संसार मांडणार असं स्वप्न उरी घेऊन पळून गेलेल्या या तरुणीसोबत भयंकर घटना घडली.
तिच्या प्रियकरानेच तिच्यासोबत गैरकृत्य केले. इतकेच नाही तर प्रियकराच्या वडिलांनी या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा गंभीर प्रकार घडत असल्यामुळे या प्रियसीने हिंगोली शहर पोलीस स्टेशन गाठून आता प्रियकर शैलेश राठोडसह त्याचा बाप विष्णू राठोड यांच्याविरोधात हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे . हिंगोली शहर पोलिसांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने बलात्कारासह विविध कलमानुसार प्रियकर शैलेश राठोड व त्याचा बाप विष्णू राठोड याच्यासह अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.