Saam Tv
क्राईम

Shocking : शीर धडावेगळं केलं, मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत भरला; कर्मचाऱ्याने HR ला क्रूरपणे संपवलं

Uttar Pradesh Aagra Crime News : आग्रा येथे एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने HR मॅनेजरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्रेमप्रकरणातून हा गुन्हा घडल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • आग्रा येथे HR मॅनेजरची हत्या

  • सहकारी विनय राजपूतवर प्रेमप्रकरणातून गुन्हा केल्याचा आरोप

  • सीसीटीव्हीच्या आधारे २४ तासांत आरोपी अटक

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

एका ऑफिस कर्मचाऱ्याने HR ची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत भरून, पुलावर नेवून फेकला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. सदर घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मिंकी शर्मा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पार्वती विहार, तेधी बागिया येथे कुटुंबासोबत राहायची. संजय प्लेस येथील मारुती प्लाझाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या एका खाजगी कंपनीत मिंकी शर्मा एचआर मॅनेजर होती. आरोपी विनय राजपूत देखील याचं कंपनीत कामाला होता. हे दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून रिलेशनमध्ये होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना देखील याबाबत सांगितले होते. पण सहा महिन्यांपूर्वी त्याला कळले की मिंकी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत आहे आणि त्याला भेटायलाही जात आहे. यामुळे त्याला वाईट वाटले. त्यांच्यामध्ये या कारणावरून खटके उडू लागले.

पीडित तरुणी मिंकी शर्मा २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घरातून निघाली. तिने तिच्या कुटुंबाला सांगितले की, ती तिच्या भावाच्या लग्नाची पत्रिका कुरियर करण्यासाठी जात आहे. मात्र त्या दिवशी ती घरी आलीच नाही. शिवाय तिचा फोन देखील बंद होता. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मिंकी सापडली नाही म्हणून तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी विनयने गुन्हा काबुल केला असून तो म्हणाला की, मिंकी मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न करणार होती. याच रागातून मी तिची हत्या केली. पुढे तो म्हणाला की, घटनेच्या दिवशी त्याने मिंकीला ऑफिसमध्ये बोलावले होते. त्यांच्यात भांडण झाले. त्याने चाकू आणला होता आणि मिंकीवर वारंवार हल्ला केला. चाकूने तिच्या मानेवर वार केले ज्यामुळे रक्तस्त्राव झाला. ती जमिनीवर पडली. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला.

त्याने मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत ठेवला. चाकूने मिंकीचे डोके शरीरापासून वेगळे केले. नंतर ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. त्याने पार्सल पॅकिंग टेपने ते गुंडाळले. डोके त्याच्या पिशवीत ठेवले. त्यानंतर तो मिंकीच्या स्कूटरने जवाहर पुलावर गेला. नदीत टाकणार इतक्यात तिथे काही जण आल्याने त्याने मृतदेह भरलेली पिशवी पुलावरच सोडून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी विनयवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT