Hyderabad saam Tv
क्राईम

Hyderabad Prisoner: कैद्याच्या पोटात आढळलं ब्लेड,स्कू अन् गांजाचं पाकीट; कारण ऐकून डॉक्टरांसह पोलीसही चक्रावले

Hyderabad : तेलंगणातील हैदराबाद येथील चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगात असलेल्या एका अंडरट्रायल कैद्याच्या पोटात एक ब्लेड, स्क्रू आणि गांजाचे पाकीट आढळून आले. या कैद्याचे नाव सोहिल असे आहे.

Bharat Jadhav

Hyderabad Prisoner:

हैदराबाद येथील चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात एक विचित्र प्रकार समोर आलाय. कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या एका चोराने पोलिसांकडे पोट दुखत असल्याची तक्रार केली. कैद्याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. त्यावेळी त्याच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टारांनी डोक्याला हात लावला. पोलिसांच्या हाती आलेल्या रिपोर्टनुसार, या चोराच्या पोटात एक ब्लेड, स्क्रू, आणि गांजाचं पाकीट आढळून आलं. या गोष्टी त्याने का गिळल्या याचं कारण त्याने डॉक्टरांना सांगितलं हे कारण कारण ऐकून सर्वजण च्रकावलेत.(Latest News)

या कैद्याचे नाव सोहिल असून तो १९ वर्षाचा आहे. त्याच्यावर अनेक चोरीचे (Theft) गुन्हे दाखल आहेत. कैदी साहिलने केलेला पराक्रम पाहून डॉक्टर (Doctor)आणि पोलीस चक्रावले आहेत. सोहिलच्या पोटात डॉक्टारांना एक ब्लेड, स्कू आणि गांजाचं पाकीट आढळून आले आहे. ८ तारखेला साहिलला पोटदुखीचा त्रास होत होता. आपल्याला पोटदुखीचा त्रास होतोय, वैद्यकीय तपासणीची गरज असल्याची विनंती केल्यानंतर पोलिसांनी (Police) त्याला डॉक्टरांकडे नेलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावेळी त्याच्या पोटाचा एक्स-रे काढला. त्यावेळी डॉक्टरांना त्याच्या पोटात धातू सदृश्य वस्तू आढळून आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच ऑपरेशन केलं. त्यावेळी त्याच्या पोटातून एक ब्लेड, स्क्रू आणि गांजाचं पाकीट बाहेर काढण्यात आलं.

डॉक्टरांनी काय सांगितले

सोहिलला त्याला पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात आणणयात आले. कैद्यांमध्ये अशा गोष्टींचे सेवन करणे असामान्य आहे. दरम्यान आम्ही सर्व गोष्टी त्याच्या पोटातून बाहेर काढल्या आहेत. हे सर्व एन्डोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले. सोहिल आता धोक्याबाहेर आहे,” असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.बी.नागेंद्र यांनी सांगितले.

तुरुंग अधिकाऱ्याने काय सांगितले

तुरुंगातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर सोहिलला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्याने त्या वस्तू गिळल्या असाव्यात. "आम्हाला शंका आहे की त्याला एक दिवस आधी वस्तू मिळाल्या असतील. जेव्हा त्याने असह्य वेदना झाल्याची तक्रार केली होती आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले ,"असं अधिकाऱ्याने सांगितले.

सोहिलवर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पीडी कायदा किंवा प्रतिबंधात्मक अटकेचा कायदा लागू करण्यात आला होता, जो नुकताच मागे घेण्यात आला होता. डॉ नागेंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याने “राग आणि निराशेमुळे” वस्तूंचे सेवन केल्याचे कबूल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT