Shahapur Shevanti Park building girl dies Saam Tv News
क्राईम

मैत्रिणींसोबत खेळताना तोल गेला, चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली; सर्वांची लाडकी प्रज्ञा आई-वडिलांना सोडून गेली

Shahapur 14 Year Old Girl Dies after Falling from Building : काल रात्री इमारतीच्या गच्चीवर काही मुलींसोबत खेळत असताना प्रज्ञाचा तोल गेला आणि ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. एवढ्या उंचावरुन खाली पडल्याने प्रज्ञा गंभीर जखमी झाली.

Prashant Patil

ठाणे : शहापूर शहरातील गोणेनगर मधील शेवंतीपार्क इमारतीत राहणाऱ्या प्रज्ञा विलास पडवळ (वय १४) या इयत्ता ९वीत शिकणाऱ्या मुलीचा इमारतीच्या टेरेसवरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल रात्री इमारतीच्या गच्चीवर काही मुलींसोबत खेळत असताना प्रज्ञाचा तोल गेला आणि ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. एवढ्या उंचावरुन खाली पडल्याने प्रज्ञा गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डोक्याला जबर मार लागल्यामुळे आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शेवंतीपार्क इमारत, पडवळपाडा गावात तसेच शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

७ वर्षांनी बाळ झालं, २१व्या मजल्यावरुन आईच्या हातातून सुटलं...अन्...

दरम्यान, विरारमध्ये देखील अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २१व्या मजल्यावरून खाली पडल्याने अवघ्या ७ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल बुधवारी २३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिमेकडील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत घडली आहे.

विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीमधील २१व्या मजल्यावर राहत होते. त्यांचा सात महिन्यांचा मुलगा व्रिशांक उर्फ वेद याला झोप येत नव्हती, म्हणून पूजा सेदानी त्याला कुशीत घेऊन मास्टर बेडरुममध्ये फिरत होत्या. बेडरुममध्ये हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती. मात्र, अचानक फरशी ओलसर असल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या. या झटक्यात त्यांच्या कुशीत असलेला व्रिशांक हा बाल्कनीतून थेट खाली पडला. या दुर्घटनेनंतर तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सेदानी कुटुंबाला ७ वर्षांनंतर मूल झालं होतं. त्यामुळे हा अपघात त्यांच्या आयुष्यात खोलवर रुतलेल्या जखमेसारखा काळा ठसा उमटवणारा ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

SCROLL FOR NEXT