प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना Saam Tv
क्राईम

Satara News: प्रेमाचा भयानक शेवट! किरकोळ वादातून प्रियकराने प्रेयसीला बिल्डिंगवरून ढकललं, तरूणीचा मृत्यू

Boyfriend Killed Girlfriend In Karad: साताऱ्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडलीय. मलकापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

संभाजी थोरात, साम टीव्ही कराड

साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. प्रियकराने प्रेयसीची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचं समोर आलंय. कराडमध्ये किरकोळ वादातून प्रियकराने प्रेयसीला बिल्डिंगवरून ढकलून दिलं. या घटनेत तरूणीचा मृ्त्यू झालाय. ही धक्कादायक घटना मलकापूरमध्ये घडली आहे, तर तरूण देखील जखमी झाल्याचं समोर आलंय.

प्रियकराने प्रेयसीची हत्या केली

कराडमधील मलकापूरमध्ये ही घटना घडल्याचं समोर (Satara News) आलंय. आरुषी मिश्रा, असं मृत प्रेयसीचं नाव आहे. तर ध्रुव छिक्कर असं, तरूणाचं नाव आहे. हे दोघेही कृष्णा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ते दोघेही उत्तर भारतीय असल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नक्की काय घडलं?

काल ३१ जुलै रोजी आरुषी आणि ध्रुवमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला (Crime News) होता. शा‍ब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं होतं. संतापाच्या भरात ध्रुवने आरुषीला बिल्डिंगवरून खाली ढकलून दिलं. यामध्ये आरूषीचा मृत्यू झाला, तर मारहाणीत ध्रुवदेखील गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय. सुरूवातीला तरूणीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु पोलीस तपासात हत्या झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी १ ऑगस्ट पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात (Boyfriend Killed Girlfriend) आलाय.

दुसरी धक्कादायक घटना

कराडमध्ये कर्जाच्या कटकटीमुळं डॉक्टरने आत्महत्या केल्याचं समोर आलंय. कराड तालुक्यातील ओंड येथील ही घटना आहे. डॉ. हेमंत रेळेकर, असं मृत डॉक्टरचं नाव (Karad News) आहे. त्यांनी दवाखान्यातच गळफास घेत जीवन संपवल्याचं समोर आलंय. फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे डॉ. हेमंत रेळेकर यांनी आत्महत्या केली, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT