Sangli Crime Saam Tv
क्राईम

Sangli Crime : इन्स्टाग्रामवर स्टोरी का बघतोस? तरूणावर दोघांनी केला चाकूहल्ला; मिरजेत खळबळ

Rohini Gudaghe

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगलीमध्ये कोयता गॅंगची दहशत कायम असल्याचं समोर आलंय. कारण मिरजेत कोयत्याने हल्ले होण्याच्या घटना चालूच आहेत. आता 'इन्स्टाग्रामवर स्टोरी का बघतोस?' म्हणून एका युवकावर दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तरूणावर कोयता आणि चाकूने हल्ला

सांगलीच्या मिरजेत कोयत्याने हल्ले होण्याच्या घटना काही थांबत नसल्याचं (Knife attack) दिसतंय. किरकोळ कारणावरुनही हल्ले होत आहेत. इन्स्टाग्रामवर स्टोरी बघतोस, या क्षुल्लक कारणावरून एका तरूणावर चक्क कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना काल २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. धीरेन उर्फ यश रवी पालेकर, असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

इन्स्टाग्राम स्टोरी बघण्यावरून वाद

धीरेनवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू (Sangli News) आहेत. दरम्यान धीरेनवर जीवघेणा हल्ला करणारे दोन संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद असल्याचं समोर आलंय. त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मिरजेत मोठी खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरी बघण्यावरून वाद झाला होता, अशी माहिती मिळत (Crime News) आहे.

मिरजेमध्ये कोयता गॅंगची दहशत

काही महिन्यापूर्वी मिरजेमध्ये कोयता गॅंगची दहशत बघायला मिळाली होती. तर आता किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकूनेच वार करून गंभीर जखमी (Sangli Crime News) केलंय. इन्स्टाग्रामवर स्टोरी, या किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून तरूणावर कोयत्याने वार केले होते. या घटनेत तरूण गंभीर जखमी झाला होता. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनांमुळे मिरजमध्ये कोयता गॅंगची दहशत पाहायवसा मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT