Maharashtra Breaking News:  Saam tv
क्राईम

Sangli Crime: 'भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?' किरकोळ वादातून घडलं भयंकर; डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीला संपवलं

Maharashtra Breaking News: पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन पतीने डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना विटा येथील खानापूर नाका परिसरात घडली.

विजय पाटील

सांगली, ता. ५ जुलै २०२४

भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून निर्घृणपणे खून केला. सांगली जिल्ह्यातील विटा येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन पतीने डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना विटा येथील खानापूर नाका परिसरात घडली. या प्रकरणी विटा पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे. भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी असे संशयित पतीचे नाव आहे. तर सलमा गुराप्पा इकुरोट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास आहे. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते रहात होते.

बुधवारी रात्री विट्यातील हजारे मळा परिसरात भाड्याच्या घरात रहायला जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच रागाने डोक्यात खोरे घालून वर्मी गाव करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत खुनाचा गुन्हा विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT