Sangli News  Saam Tv
क्राईम

Sangli News : मोठी बातमी! शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद, VIDEO

Firing On Shiv Sena Uddhav Thackeray Group Leader Dinkar Patil Nephew : सांगलीत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला झालाय. एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

Rohini Gudaghe

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगलीमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मात्र, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. परंतु घटनेनंतर हल्लेखोर पसार झाल्याचं समोर आलंय. कवठेमहांकाळमध्ये ही घटना शनिवारी रात्री घडलीय. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली (Sangli Crime News) नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना मात्र हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. हल्लेखोरांनी मात्र या प्रकारानंतर धूम ठोकली आहे.

मोबाइल शॉपीमध्ये झाला हल्ला

कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ( Uddhav Thackeray Group) नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न झालाय. मात्र, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यामुळे गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे. घटनेची शनिवार १० ऑगस्ट रोजी रात्री घडली. परंतु, उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नव्हती.

सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण थरार कैद

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे अभिजित पुत्र आहेत. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. यामुळे अभिजित थोडक्यात बचावल्याचं समोर (Firing Incident) आलंय. सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण थरार दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT