Sangamner Jail Crime News Saam Digital
क्राईम

Sangamner Jail Crime News: संगमनेर कारागृहातून फरार झालेले चारही आरोपी जेरबंद, एका शेतात बसले होते लपून

Crime News: संगमनेर कारागृहातून फरार झालेल्या चार आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून जेरबंद करण्यात आले आहे. संगमनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला या आरोपींना ३६ तासात शोधून काढण्यात यश आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime News

संगमनेर कारागृहातून फरार झालेल्या चार आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून जेरबंद करण्यात आले आहे. संगमनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला या आरोपींना ३६ तासात शोधून काढण्यात यश आले असून आरोपींना मदत करणाऱ्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. फरार झालेले आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एका शेतात लपून बसले होते.

संगमनेर कारागृहाचे गज कापून हे चारही सराईत गुन्हेगार बुधवारी पहाटे (ता.८) फरार झाले होते. सकाळी सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खळबळ माजली होती. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. या चारही आपोपींना गंभीर गु्न्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील एका आरोपीवर खून, दोघांवर अत्याचार आणि एकावर खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान हा कट गेल्याकाही दिवसांपासून सुरू होता. हे काम एका दिवसात होणे शक्य नाही. बराकीच्या कूलरच्या आवाजाचा फायदा घेऊन कारागृहाचे गज कापले असावेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी राज्यभर पोलिसांची अनेक पथके धाडण्यात आली होती. अखेर ३६ तासातच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT