Sangali News Saam Digital
क्राईम

Sangali News: गोव्याची दारू महाराष्ट्राच्या बाटल्यामध्ये भरून सुरू होती विक्री...प्रकार पाहुन पोलीसही चक्रावले

Sangali News: सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज येथे एका हॉटेलवर चक्क गोवा बनावटीची दारू महाराष्ट्राचे लेबल असलेल्या बाटल्यामध्ये भरून बेकायदेशीर विक्री सुरू होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sangali News

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज येथे एका हॉटेलवर विटा उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून चक्क गोवा बनावटीची दारू महाराष्ट्राचे लेबल असलेल्या बाटल्यामध्ये भरून बेकायदेशीर विक्री सुरू होती. विनोद विठ्ठल माने, सुशांत अशोक गायकवाड, गणेश मालोजी शिंदे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

विटा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय मनाळे यांना सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर गोवा बनावटीची दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार विटा उत्पादन शुल्कच्या पथकाने सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर छापा टाकला. यावेळी या पथकाला हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये तसेच किचन भट्टीला लागून असलेल्या भूमिगत पाण्याच्या रिकाम्या टाकीत गोवा बनावटीचा दारूसाठा सापडला.पोलिसांनी झडती घेतली असता बॉटलींग उपकरणे, बाटल्याची बनावट झाकण, गोव्याची दारू भरण्यासाठी आणलेल्या व महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या रिकाम्या बाटल्या, मोबाईल, गाळणी, प्लॉस्टिक कॅन असे साहित्य आढळून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोवा बनावटीचा हा दारूसाठा महाराष्ट्राचे लेबल असलेल्या बाटल्यामध्ये भरून विक्री केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून यांची किंमत अंदाजे ४ लाख २४ हजार ८९५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : दुष्काळाची झळ तुळजापूरातील प्रसिद्ध असलेला अडातील गणपती मंदीरालाही

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

CJP protest: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP आक्रमक; राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार

SCROLL FOR NEXT