Pune Crime News  Saam TV
क्राईम

Pune Crime News : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Robbery in Chitale Bandhu Shop : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. घरफोडी तसेच दुकानांवर डल्ला मारणे यासह सायबर चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध बाणेर रोडवरील दुकान फोडून चोरट्यांकडून डल्ला मारण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखीस समोर आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली आहे. चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम चोरल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखीस समोर आला आहे, व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आहे. दुकानात आल्यावर त्यांनी थेट गल्ला फोडला. यात असलेली सर्व रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत.

पुण्यात पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. घरफोडी तसेच दुकानांवर डल्ला मारणे यासह सायबर चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी देखील अशीच एक सायबर गुन्हेगारीची घटना समोर आली होती.

सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याच्या बहाण्याने पाषाण आणि सदाशिव पेठेतील दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ७० लाख रुपये चोरी केले. याबाबत पाषाणमधील एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT