crime News Saam Tv
क्राईम

Ratnagiri Crime : भयंकर! अत्याचार करून तरूणीला कचऱ्यात फेकलं, बेशुद्धावस्थेत सापडली; रत्नागिरीमधील संतापजनक घटना

Girl thrown in garbage after physically abused : रत्नागिरीमध्ये अत्याचार केल्यानंतर तरूणीला कचऱ्यात फेकल्याचं समोर आलंय. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Rohini Gudaghe

साम टीव्ही, मुंबई

कोलकाता, बदलापूर, कोल्हापूरनंतर आता रत्नागिरीमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना घडल्याचं मसोर आलंय. परिचारिकेचं शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या घटनेनंतर रत्नागिरीमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते, आक्रमक होत त्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

पीडित तरूणीसोबत नक्की काय घडलं?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडित तरूणी तिच्या गावी घरी गेली होती. सोमवारी ती गाववरून परत (Ratnagiri Crime News) आली. सोमवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ती रत्नागिरीमध्ये पोहोचली होती. त्यानंतर ती साळवी स्टॉपवरून एका रिक्षामध्ये बसली. परंतु त्यानंतर तिला मळमळू लागले म्हणून रिक्षा चालकाने या तरूणीला पाणी दिलं. मात्र त्यानंतर तरूणीची शुद्ध हरपली. पुढे काय घडलं, हे आठवत नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

बेशुद्धावस्थेत विद्यार्थिनीला कचऱ्यात फेकलं

जेव्हा या तरूणीला शुद्ध आली, तेव्हा ती चंपक मैदानाजवळच्या कचरा टाकला जाणाऱ्या भागामध्ये (Crime News) होती, अशी माहिती पीडित तरूणीने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) अन्वये याप्रकरणी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. घटनेनंतर नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा रूग्णालयात जमा झाले होते. बदलापूर आणि कोलकाता नंतर आता रत्नागिरीही सुरक्षित राहिली नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला (Ratnagiri News) होता. आरोपीला लवकर शोधा, त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमाव करत होता.

रत्नागिरीमधील धक्कादायक घटना

संतप्त जमावाला शांत करणं, पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलं होतं. पंरु पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई केली जाईल, अशी हमी दिली. त्यानंतर जमाव शांत झाला होता. अत्याचार करुन बेशुद्धावस्थेत विद्यार्थिनीला (physically abused) कचऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीमध्ये घडला. यामुळे संतप्त होवून लोक रस्त्यावर उतरले होते. पोलीस तरूणीसोबत नेमकं काय घडलं? यामागे कोण आहे, याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT