Rajasthan Crime Saam Tv
क्राईम

Rajasthan Crime: कोलकातानंतर जोधपूरमध्ये संतापजनक घटना; रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Rajasthan Crime: कोलकातामधील घटना ताजी असतानांच जोधपूरमध्ये तशीच एक घटना घडलीय. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरलीय. जोधपूरमधील रुग्णालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

Bharat Jadhav

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक संतापजनक घटना घडलीय. येथील रुग्णालयाच्या प्रांगणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर पोलीस अधिकारी एफएसएल टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केलाय. येथील महात्मा गांधी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि एफएसएल पथकांना तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. पीडित मुलीने सफाई कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय. जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात ही घटना घडली असून या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरलीय. अमानवीय कृत्य करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.

या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागे झाले असून तपास सुरू केलाय. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केलीय. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने जोधपूरच नाही तर संपूर्ण देश हादरलाय. रुग्णालयासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा घटना घडल्याने समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT