Raigad Crime News saam tv
क्राईम

Raigad Crime: रायगड पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा, बंदुक, काडतुसासह, घातक शस्त्र बनविणारा अड्डा उध्वस्त; एकास अटक

Raigad News: पोलिसांनी आज (मंगळवार, ९ जानेवारी) रोहामध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत बंदुका, काडतुस आणि इतर शस्त्र बनवणारा अड्डा उध्वस्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, रायगड|ता. ९ जानेवारी २०२४

Raigad News:

रायगड जिल्ह्यातील रोहामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. या कारवाईमध्ये गावठी कट्टा, बंदुका, काडतुस, घातक शस्त्र बनविणारा अड्डा रायगड पोलिसांनी उध्वस्त केला आहे. तसेच शस्त्र, वन्य प्राण्यांची शिंगेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड (Raigad) पोलिसांनी आज (मंगळवार, ९ जानेवारी) रोहामध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत बंदुका, काडतुस आणि इतर शस्त्र बनवणारा अड्डा उध्वस्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रोहा शहरात ही धडक कारवाई करीत एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तन्मय भोकटे असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

या कारवाईदरम्यान त्याच्या घरातून गावठी कट्टा, पिस्तूल, शिकारीच्या बंदुका, काडतुसे याच्या सह धारदार तलवारी, चाकू, कोयते अशी शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. ही शस्त्रे तो स्वतः घरी बनवायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. या शिवाय हरीण, सांबर या सारख्या दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या शिंगांच्या तब्बल 22 जोड्या देखील त्याच्या घरात सापडली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षावर मोठी कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांनी ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा प्रकार तालुकाध्यक्षांने सुरू केला होता. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

तालुकाध्यक्ष अशोक बापू पाटीलसह (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT