Pune Rajaram Bridge Youth Jump Saam Tv News
क्राईम

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Pune Rajaram Bridge Youth Jump : पुण्याच्या राजाराम पुलावरुन नदीपात्रात उडी घेत तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील अग्नीशमन दलावे वेळेच्या आत तरुणाला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला आहे.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टिव्ही

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. हत्या, बलात्कार आणि आत्महत्यांसारख्या घटनांची जणू साखळीच सुरु आहे. यात पुणे शहरात या घटनांचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. अशातच एक अशीच घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या राजाराम पुलावरुन नदीपात्रात उडी घेत तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील अग्नीशमन दलावे वेळेच्या आत तरुणाला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला आहे. पार्थ लोहिया असं तरुणाचं नाव आहे. इंजिनिअरींगमध्ये तीनवेळा नापास झाल्यामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण

पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोयते, हातोड्याने पुण्यात मारहाण करत राडा झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये घडली आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण हातात कोयते घेऊन कॉलेज परिसरात मारहाण करत असल्याचे दिसते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. काही तरुण कोयते, हातोड्याने हाणामारी करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या मारमारीमध्ये दोन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये कोयते आलेच कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुण एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसते. या तरुणांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचेही पाहायला मिळते. हाणामारी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचेही व्हिडीओत दिसते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाचे दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

Trending Blouse Designs: ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणत्याही साडीत उठून दिसेल मागचा गळा

SCROLL FOR NEXT