Shirur Crime Saam tv
क्राईम

Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Pune Shirir News : अज्ञात दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास शेजारील घराला बाहेरून कुलूप लावून घरात प्रवेश केला. या घरात दापत्य झोपलेले होते.

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : शिरूर तालुक्यातील आरणगावात भयानक घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इराद्याने दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घरात असलेल्या पती- पत्नीवर दरोडेखोरांनी हल्ला (Crime News) करत मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर महिलेचा पती देखील गंभीर जखमी झाला आहे. (Tajya Batmya)

पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यातील आरणगाव येथील ठोंबरेवस्ती येथे पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास शेजारील घराला बाहेरून कुलूप लावून घरात प्रवेश केला. या घरात दापत्य झोपलेले होते. घरात कोणीतरी आल्याची चाहूल लागताच पती- पत्नी जागे झाले व त्यांनी (Robbery) चोरट्याने विरोध केला. मात्र दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात फुलाबाई आनंदा ठोंबरे ही महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा पती आनंदा सावळेराम ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साडेसात तोळे सोने लांबवीले 

पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दाम्पत्याला जबर मारहाण करुन घरातील तब्बल साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचे समोर आले आहे. दरोडेखोर दागिने घेऊन पसार झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत आनंदा ठोंबरे यांनी आजूबाजूच्या नागरिकांना माहिती दिली. यानंतर सदर घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत माहिती घेतली असून याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT