Pune crime Saam Tv
क्राईम

Pune Crime : पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; प्रियकरासोबत छत्तीसगडवरून गाठलं होत पुणे

Pune crime : एका अल्पवयीन मुलीवर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडलीय.

Bharat Jadhav

RPF Policemen Physical Abuse Minor Girl:

प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा मनात घेऊन अल्पवयीन मुलीनं घर सोडलं. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने त्याच्यासोबत छत्तीसगडहून पुणे गाठलं. पण आरपीएफ जवानाने त्या अल्पवयीन मुलीला पाच डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या वडिलांनी तिची सुटका केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी जवानाविरुद्धात गुन्हा दाखल केलाय. (Latest News)

पीडित मुलगी दहावीमध्ये शिकते. ती आणि तिचं कुटुंब छत्तीसगडमधील राज्यात राहतं. शाळेत शिकत असताना तिचं लीलाधर ठाकूर नावाच्या मुलावर प्रेम जडलं. दोघांनी लग्न करण्याचं वचन एकमेकांना दिलं. लीलाधर ठाकूरने तिला सांगितलं की तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. पुण्यात जाऊन आपण लग्न करू अशी बतावणी त्याने केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लीलाधरच्या या प्रेमी गोष्टींना पीडिता भाळली आणि तिने त्याच्यासोबत घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी १२ सप्टेंबर रोजी पुणे गाठलं. पुणे रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्याच्या जवळ तीन व्यक्ती आल्या. त्यांनी त्यांना हटकलं. त्यानंतर त्यांनी या दोघांना पोलिसांकडे नेले. तेथे अनिल पवार नावाचा पोलीस कर्मचारी होता. अनिल पवार याने पीडित मुलगी आणि लीलाधर ठाकूर याला बराच वेळ बसवून ठेवले.

त्यानंतर रेल्वे जवान अनिल पवार याने या दोघांना रेल्वे कॉलनीतील एका खोलीत कैद केले. या दोघां त्याने पैश्याची मागणी केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बाहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यानंतर कमलेश आणि अनिलने लीलाधरला सोडून दिले. मात्र पीडितेला तेथेच डांबून ठेवले. त्यानंतर पवार आणि तिवारी हे तिच्यावर बलात्कार करत राहिले. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांना त्याची मुलगी पुण्यात असल्याची माहिती झाली. ते छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि पीडितेची सुटका केली. घरी गेल्यानंतर तिने छत्तीसगड पोलिसांना आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT