Minor girl physically abused Saam Tv
क्राईम

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर घटना उघडकीस!

Minor girl physically abused in Hinjewadi police station area : पिंपरी चिंचवडमधून देखील अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय.

Rohini Gudaghe

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार लैंगिक अत्याचार केलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत (Pune News) आहे.

काय आहे घटना?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, 'कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारीन' अशी धमकी देत २३ वर्षीय आरोपीनं १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. वारंवार झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली (Pimpri Chinchwad news) होती. ही गोष्ट पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर पालकांनी हिंजवडी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय.

सोशल मीडियावर मैत्री

या प्रकरणात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या (physically abused) आहे. आरोपी पीडितेशी सोशल मीडियावरून संपर्कात आला होता. मार्च २०२४ ते जून २०२४ दरम्यान कार्तिक कांबळे या नराधमाने सोशल मीडियावर पीडित मुलीशी ओळख केली होती. त्यानंतर संपर्कात आल्यानंतर आरोपीने पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचं समोर आलंय.

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना

हिंजवडी परिसरातील नेरे भागातील ही धक्कादायक घटना घडलेली (crime news) आहे. जीवे मारण्याची धमकी देत तसेच बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने अत्याचार केल्याचं समोर आलंय. याप्रकरणात हिंजवडी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सोशल मीडियावर मैत्री करत आरोपीने पीडित मुलीसोबत गैरप्रकार केल्याचं समोर आलंय. अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यच हादरत आहे. मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT