Crime News Saam Tv
क्राईम

Husband kills wife : धक्कादायक! कौटुंबिक वाद टोकाला; भडकलेल्या नवऱ्याने मध्यरात्री बायकोची कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या

Husband kills wife in pune : पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. भडकलेल्या नवऱ्याने मध्यरात्री बायकोची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात कौटुंबिक वादाची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर नवऱ्याने मध्यरात्री बायकोची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. पुण्यातील लोणीकंद भागात ही घटना घडली आहे. या घटनेने पुण्यातील लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद भागात पतीने वादानंतर पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. वादानंतर मध्यरात्री नवऱ्याने बायकोसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. लक्ष्मीबाई जाधवराव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हत्येप्रकरणी पती बाबा जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील बुर्के गावात जाधव दाम्पत्य वास्तव्यास होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. सोमवारी रात्रीही बाबा जाधव हा घरी आल्यानंतर त्याचे त्याच्या पत्नीशी वाद झाले.

वादानंतर पतीने मध्यरात्री १ वाजल्यानंतर घरातील कुऱ्हाडीने त्याच्या झोपलेल्या पत्नीवर सपासप वार केले. या हल्ल्यात लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीबाई यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, लक्ष्मीबाई यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या हत्येच्या घटनेने बुर्के गावात खळबळ उडाली आहे. तर लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूनंतर बुर्के गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT