Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात सोन्याचे दागिने मागितल्याच्या वादातून पतीने पत्नीची धारदार चाकूने हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून पती-पत्नीमध्ये वाद

  • पतीने धारदार चाकूने पत्नीवर हल्ला करून हत्या केली

  • घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांनी काही तासांत अटक केली

  • लोणीकंद पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू

गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे महिला वर्गातून सोनेखरेदीसाठी मागणी कमी झाली आहे. दररोज वाढणारे सोन्याचे भाव ऐकून खरेदीदारांचा हिरमोड होत आहे. अशातच सोन्याचे दागिने मागितल्याने पुण्यात पतीने पत्नीची हत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात घडली आहे. नम्रता शैलेंद्र व्हटकर असे मृत महिलेचं नाव असून आरोपी पतीचं नाव शैलेंद्र व्हटकर असे आहे. गेले कित्येक दिवस नम्रता वारंवार शैलेंद्रकडे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी तगादा लावतं होती.

यावरून या दोघांमध्ये वाद देखील झाला. नेहमीच्या त्रासाला कानातल्या शैलेंद्रने नम्रताचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार शैलेंद्रने पत्नी नम्रताला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले होते. त्यांनतर त्याने धारदार चाकूने नम्रतावर हल्ला केला. या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पत्नीची हत्या करून शैलेंद्रने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही तासांतच घटनेचा छडा लावत आरोपीला अटक केली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील बाभुळखेडा गावात सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

ZP Election : कोकणात ठाकरेंना पहिला मोठा धक्का; शिंदेसेनेचा उमेदवार बिनविरोध

Heart Attack: सकाळी उठल्यावर थकवा आणि चक्कर येतेय? हार्ट अटॅकची ही लक्षणं दुर्लक्ष करू नका

Crime News: आधी कारसह जाळलं; नंतर दाखवला अपघात, मित्रानेच मित्राचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बिंग फुटलं

Baramati Accident: पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात;भरधाव कारचा टायर फुटला, दुभाजक ओलांडत दुसऱ्या वाहनाला कारची जबर धडक

SCROLL FOR NEXT