Maharashtra Breaking News:  Pune
क्राईम

Pune Crime: डेक्कन भागात जबरी चोरी, माल मेट्रो स्टेशनजवळ लपवला; पोलिसांनी सापळा रचला अन् पर्दाफाश झाला

Maharashtra Breaking News: डेक्कन जिमखाना भागातील एका बंगल्यात चोरी झाली असून घरातील दागिने चोरीला घटना घडली होती. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. १५ जुलै २०२४

पुणे शहरातील उच्चभ्रू भाग असलेल्या डेक्कन भागात चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. हिरेजडीत हार, टीबीबल २० तोळे दागिन्यांसह आठ हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डेक्कन जिमखाना भागातील एका बंगल्यात चोरी झाली असून घरातील दागिने चोरीला घटना घडली होती. या संदर्भात एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती घेतली असता यामध्ये अल्लाबक्ष महंमद पिरजादे याचा सहभाग झाल्याचे उघडकीस आले. पीरजादेने घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी मंगळवार पेठेत सापळा रचला. पोलिसांचा सापळा आरोपीला दिसला आणि त्याने तिथून पळ काढला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले अन् अटक केली. यानंतर झालेल्या चौकशीमध्ये त्याने सर्व दागिने पुणे महापालिका जवळ असलेल्या मेट्रो स्थानकाच्या जवळ एका खड्ड्याखाली लपवले असल्याची कबुली दिली. या माहितीप्रमाणे पोलिसांनी १७ लाखांची रोकड जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT