Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पुणे ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट; तपासात पोलिसांच्या हाती लागली महत्वाची माहिती

Crime News: पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नागरिकाने एमडी ड्रग्स दिले होते.या "प्रीमियम" एमडी ड्रग्सची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

Ruchika Jadhav

Pune News:

पुणे ड्रग्स प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. पुणे ड्रग्स तस्करी प्रकरणाचे नायजेरीयन कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालीये. पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नायजेरीयन नागरिकाने एमडी ड्रग्स दिले होते. या "प्रीमियम" एमडी ड्रग्सची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

एका नायजेरीयन व्यक्तीने ड्रग्स विक्रीसाठी हैदर शेख याच्याकडे दिले होते. शेखकडे हे एमडी ड्रग्स भारतातील विविध भागात पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या नायजेरीयन नागरिकाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक रवाना झालं आहे.

नेमकं प्रकरण काय?

२ दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ जणांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या ३ आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आलेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. हैदरने ड्रग्स साठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता.

पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात समोर आलेय. पुण्यात सापडलेल्या ड्रग्सची विक्री देशातील विविध भागात तसचं परदेशात होणार होती. पुण्यात पकडलेले एमडी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे त्यांची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. अशात आता हैदर शेखकडे सापडलेले ड्रग्स एका नायजेरीयन व्यक्तीने त्याला दिल्याचे समजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT